पुरंदरमध्ये राडा, विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध, पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री..


पुरंदर : पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या ड्रोन सर्व्हेला विरोध करताना शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. पुरंदरचा ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आज प्रशासनाची मोठी टीम दाखल झाली.

यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या सर्व्हेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. पण प्रशासन ड्रोन सर्व्हे करण्यास ठाम आहे. पुरंदर तालुक्यात आतंरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. मात्र, याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे.

मात्र, या विमानतळामुळे बाधित सातही गावांमधील शेतकऱ्यांकडून या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. यावेळी सर्वेक्षणादरम्यान अधिकाऱ्यांची वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत.

शासन-प्रशासनाच्या या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी व स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे. सध्या पुरंदर विमानतळासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यात जनावरे तसेच बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता.तेंव्हा आंदोलनकारी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!