पुण्यात आता इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी 82 ठिकाणी चार्जिंग केंद्र होणार…!


पुणे : राज्य सरकारकडून महाराष्ट्र इलेक्‍ट्रिक व्हेईकल धोरण २०२१ नुसार इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरास प्राधान्य देण्याचे धोरण करण्यात आले आहे. त्यानुसार, पुणे महापालिकेने त्यांचा इलेक्‍ट्रिक व्हेईकल सेलही स्थापन केला आहे.

पुणे महापालिकेकडून आता खासगी संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्या इमारतींमध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याद्वारे विविध घटकांच्या नियमित बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत.

शहरातील इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. भविष्यात या वाहनांच्या चार्जिंगचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होऊ शकतो, या दृष्टीने शहरात चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी महापालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे.

शहरात एकूण ८२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित केंद्र उभी राहणार आहेत.

या चार्जिंग स्टेशन्समध्ये दोन आणि चार चाकी वाहनांना चार्जिंग करता येईल, तसेच एक वाहन रांगेत उभे राहू शकते. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!