पुणे हादरलं! वैष्णवीच्या सासऱ्याचे मयुरीसोबत अश्लील कृत्य? अंजली दमानिया यांनी सगळंच समोर आणलं…


पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती रोज समोर येत आहे. आता वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिचादेखील सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. याबाबत अंजली दमानिया यांनी याबाबतचे पुरावे शेअर केले आहेत. मयुरीची आई लता जगताप यांनी महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्यावर्षी याबाबतचा ईमेल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत. यामुळे महिला आयोग नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले.

तसेच शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमधे उल्लेख आहे. महिला आयोगाने ह्यावर कारवाई का नाही केली? ह्याचे उत्तर हवे आहे. असे दमानिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. महिला आयोग ज्या पद्धतीने केवळ रोज गप्पा मारतय, यावर कोणीही कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. मग महिला आयोगाचा काय उपयोग? रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन आयोगच बरखास्त करण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!