पुणेकरांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! रिंगरोड प्रकल्प या वर्षीच होणार …!
पुणे : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. याममध्ये पुण्यासारख्या मोठ्या शहरासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
यामध्ये रिंगरोडचे काम यावर्षीच पूर्ण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी निधींची तरतूद देखील करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे तो द्रुतगती मार्गाला मिळेल.
यासाठी याआधीच पुरवणी अंदाजपत्रकात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत.