पुणेकरांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा ; आज हलक्या सरीची शक्यता, शनिवार- रविवार अधिक पावसाचा जोर


पुणे: गेल्या काही दिवसापासून शहरात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली होती.मात्र आज हवामान ढगाळ असून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच शनिवार – रविवार पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, आज महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असला, तरी पुण्यात हलक्या सरींची शक्यता आहे. नागरिकांना हवामानातील बदलांनुसार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात आज दिवसभर हवामान अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान २९°C आणि किमान तापमान २१°C पर्यंत राहण्याची शक्यता आहे.आज शहरात दिवसभर २०% तर रात्री १०% पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!