Pune Rains : पुण्यात जोरदार पाऊस सुरूच! हवामान विभागाकडून ६ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या…

Pune Rains : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज पहाटेपासून पुणे शहर परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज पुण्यासह घाट माथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पहाटेपासूव पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Pune Rains

हवामान विभागाकडून आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.