Pune Rain : मान्सूनचा जोरदार धमाका! बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांची उडाली तारांबळ, ३४ वर्षाचा रेकॉर्ड मोडला…


Pune Rain पुणे : पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे .दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या ३४ वर्षांतील सर्व विक्रम मोडले.

मागील नऊ दिवसांत २०९ मिमीपावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून २०२१९ मध्ये ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर ८ जून २०२४ लोहगावात १३९.८ तर शिवाजीनगरात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात इंदापूरमध्ये ११० मि.मी. पावसाची नोंद झाली.

संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. Pune Rain

दरम्यान, मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल १० ते १५ दिवस उशीरा आला होता. दरवर्षी शहरात तो ९ ते १० जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी २५ जून रोजी शहरात दाखल झाला होता.

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट..

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!