Pune Police MCOCA Action : हडपसर परिसरात दहशत माजविणाऱ्या बाबु मिरेकर व त्याच्या ८ साथीदारांवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ८० वी संघटीत मोक्का कारवाई..


Pune Police MCOCA Action : हडपसर येथील मिरेकर वस्तीत एकावर प्राणघातक हल्ला करून कोयते हवेत फिरवणाऱ्या कुख्यात बाबु मिरेकर व ८ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख बाबु नामदेव मिरेकर (वय. ५४), आकाश हनुमंत कांबळे (वय.२० दोघे रा. वैदुवाडी, हडपसर), अमन नवीन शेख (वय.२३ रा. गोसावी वस्ती, हडपसर), सरताज नबीलाल शेख (वय. २० रा. वैदुवाडी, हडपसर), सनी रावसाहेब कांबळे (वय.२३ रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी), रोहित शंकर हनुवते (वय. २२ रा. नवीन म्हाडा बिल्डींग, हडपसर) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

दाखल गुन्हयाचा हडपसर पोलीस व गुन्हे शाखा युनिट ०५ हे समांतर तपास करीत असताना, त्यांना त्यांचे बातमीरादारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन व सापळा लावुन दाखल गुन्हयातील वरील आरोपींना व तीन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले होते. Pune Police MCOCA Action

त्याच्याकडे अधिक तपास करीत असताना बाबु नामदेव मिरेकर टोळीविरुद्ध गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ चे विक्रांत देशमुख यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोका कारवाईस मान्यता दिली. सदर गुन्हयाचा पुढिल तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्वीनी राख हे करीत आहेत..

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!