Pune News : धक्कादायक! जळत्या सरणावरून वृद्ध महिलेचा मृतदेह दिला फेकून, भयंकर कारणाने उडाली खळबळ…

Pune News : पुण्याच्या भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला आहे.

स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण असून हे खबळबजनक कृत्य करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रविवारी रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जात हा प्रकार केला आहे.

रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकिस आली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळ्याची माहिती समोर आली. त्यामुळं या घेटनेनंतर गावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. Pune News
दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसांड झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतेय. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.