Pune News : ससून हॉस्पिटल ड्रग्सप्रकरणी पोलीस झाले खडबडून जागे, घेतला मोठा निर्णय..

Pune News पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. फरार आरोपी ललित पाटील याचा कसून शोध घेतला जात आहे. Pune News

याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून ललित पाटील प्रकरणात तीन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रकरणाची दीड महिन्यात चौकशी पूर्ण केली जाणार आहे. Pune News
तसेच तीन वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची दीड महिना चौकशी करणार आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ससून रुग्णालयात आलेल्यांकडील संशयास्पद वस्तू तपासण्याची जबाबदारी या चौघांकडे होती. तरीही ससून रुग्णालयात ड्रग्ज आणले गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे.

यावेळी ससून रुग्णालय प्रकरणी रुग्णालयात बंदोबस्तासाठी असणारे गार्डही रडारवर आले आहे. प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून ३६० पोलीस गार्डची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, ही चौकशी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात या चौकशीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.