Pune News : पुण्यात राडा! निर्भया बनो कार्यक्रमादरम्यान गदारोळ, निखिल वागळे, आयोजकांसह २०० ते २५० जणांवर गुन्हे दाखल..
Pune News : पत्रकार निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह ४३ आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची करण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान २०० ते २५० जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलात निर्भया बनो या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. Pune News
या आदेशाचं उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते.
यावेळी दोघेही आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. परिणामी मोठा गदारोळ झाला. पोलिसांच्या आदेशाचं आणि जमावबंदीचं उल्लंघन केल्याने या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.