Pune News : सोशल मीडियावर पोस्ट करताना राहा सतर्क, साताऱ्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस अलर्ट…

Pune News पुणे : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस (Pune Police) अलर्टवर आले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Pune News)

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावरुन पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तणतणाव वाढला होता. याच कारणमुळे सोशल मीडियावरून अफवा पसरवल्यास पुणे पोलीस (Pune Police) कडक कारवाई करणार असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियाचा वापर नीट करा…
सध्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन अनेक वाद निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही पोस्टमुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पुण पोलिसांनी केले आहे.

तसेच येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवायला सुरुवात केली आहे. आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सरसावले आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याच्यासाठी पुणे पोलीस अलर्टवर असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने रविवारी जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता.
तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत.