Pune News : हडपसर परिसरात खळबळ! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण…

Pune News : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामांचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शेवाळवाडी येथे फुरसुंगी फाटा येथे सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.
सतीश सातबा वाघ (वय ५८ वर्षे) रा. फुरसुंगी फाटा, आकाश लॉन शेजारी, ब्ल्यूबेरी हॉटेल शेजारी, मांजरी फॉर्म असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे हडपसर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हडपसर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. तर ते कुटुंबासोबत शेवाळवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील फुरसुंगी फाटा परिसरात राहतात. सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. 9) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉकला चालले होते. Pune News
दरम्यान, सतीश वाघ हे आकाश लॉन्स जवळ आले असता, तेव्हा एका गाडीतून आलेल्या अनोळखी इसमांनी त्याचे अपहरण केले. व गाडीच्या डिकीत डांबले. त्यानंतर अपहरण कर्त्यांनी गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे गेल्याची माहिती समोर येत आहे. Pune News
या घटनेची माहिती मिळताच, हडपसर पोलीस व पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून आरोपींच्या मार्गावर आहेत.