पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील ; वेळापत्रक जाहीर, 9 स्थानकावर थांबा..

पुणे : पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुणे- नागपूर- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. नुकतेच मंत्रालयाने वंदे भारतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पण वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून धावणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या गाडीचे वेळापत्रक समोर आले आहे. केवळ सुरुवातीची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस दररोज सकाळी साडेनऊ वाजता नागपूरच्या अजनी स्टेशनहून सुटेल आणि रात्री साडे नऊ वाजता पुण्यात पोहचेल. तर गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस सायंकाळी साडे सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता अजनी (नागपूर) स्टेशनवर पोहचेल. गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर सहा दिवस चालेल. या प्रमाणेच गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात मंगळावर सोडून इतर सहा दिवस चालेल…
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?

अजनी – सकाळी ९.५० वाजता

वर्धा – सकाळी १०.४० वा.
बडनेरा – दुपारी १२.०३ वा.
अकोला – दुपारी १ वाजता
भुसावळ – दुपारी २.५५ वा.
जळगाव – सायंकाळी – ३.२६ वा.
मनमाड – सायंकाळी ५.२५ वा.
कोपरगाव – ६.२० वा.
अहमदनगर – रात्री ७.३५ वा.
दौंड – रात्री ८.४३ वा.
पुणे – रात्री ९.५०
पुण्याला धावणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात झाला आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसचे प्राथमिक देखभाल-दुरुस्ती कार्य नागपूरमध्येच होणार आहे. सणासुदीच्या काळात व्यापारीवर्ग, विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि सामान्य प्रवासी मोठ्या संख्येने नागपूर-पुणे यादरम्यान प्रवास करतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस त्यांच्यासाठी विमान सेवेपेक्षा अधिक सुलभ व स्वस्त पर्याय ठरू शकतो.