अपघातांची मालिका सुरूच! पुणे – नगर महामार्गावर भीषण अपघात, टेम्पो चालक जागीच ठार…


पुणे : पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी (ता. शिरूर) येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला टेम्पोने मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात टेम्पों चालक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (ता.१३) पहाटे सव्वापाच वाजता घडला.

सुनील राजाराम कोळपे (वय ४०) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुणे-नगर मार्गावर सणसवाडी येथे अपघात पुणे-नगर महामार्गावर सळई वाहतूक करणारा ट्रेलर (क्र एमएच २१ बीएच १४१६) नादुरुस्त झाल्याने रस्त्याकडेला उभा होता.

पहाटेच्या वेळेस नगरच्या दिशेने पुण्याच्या बाजूने वेगाने येणाऱ्या टेम्पोच्या (क्र. एमएच १२ युएम १९९९) त्याचा अंदाज आला नाही. ट्रेलरच्या मागील बाजूस टेम्पोची जोराची धडक बसल्याने टेम्पो चालक सुनील कोळपे जागीच ठार झाले.

त्यांना क्रेनच्या मदतीने टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली झाली होती.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक पवार, सहायक फौजदार कुंभार, हवालदार पवार, नरसाळे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पखाले, रावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी घटनास्थळी मदत कार्यास सहकार्य केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!