पुणे मेट्रो अजून वाढणार! आणखी दोन स्थानकापर्यंत होणार विस्तार…!


पुणे : पुणे मेट्रोचा गाजावाजा सध्या सुरू आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. आता पुणे मेट्रोचा विस्तार आता आणखी दोन स्थानकांपर्यंत होणार आहे. आज दुपारी चार वाजता सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक दरम्यान मेट्रोची चाचणी होणार आहे.

यामध्ये मंगळवार पेठ स्थानक व पुणे स्थानक असे दोन स्थानक असून, त्यावर मेट्रोची धाव होणार आहे. यामुळे हळूहळू मेट्रोचा विस्तार पुण्यात होत आहे. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

यानंतर आठ ते दहा दिवसांत वनाज ते रूबी हॉल मार्गिकेचे ‘सीएमआरएस’चे निरीक्षण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्त हे ही चाचणी करतील. पुणेकरांसाठी हळूहळू सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

लवकरच हा सेक्शन प्रवाशांच्या सेवेत खुला होईल. त्यामुळे वनाज ते गरवारे स्थानक सुरु असलेला मेट्रोचा विस्तार रुबी हॉलपर्यंत होणार आहे. यामुळे याला प्रवासी कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!