अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला, पुण्याचे महापौरपद सिंहगड रोडकडे… मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड


पुणे : पुणे महानगरपालिकेत महिलांच्या नेतृत्वाची नवी सुरुवात झाली असून भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध होत असल्याने केवळ औपचारिक प्रक्रिया बाकी आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली होती.

सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी विराजमान झाल्या आहेत, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

आज पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत या नवांची घोषणा केली आहे.

तसेच आता पुण्याच्या महापौर व उपमहापौर निवडीनंतर फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका, अशा सूचना भाजपाकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.कुठल्याही पद्धतीचे बॅनर किंवा फटाके लावू नका. अजित पवारांच्या निधनानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!