बँकॉकला गेला, मज्जा केली, पण बायकोपासून कांड लपवायच्या नादात पुणेकर अडकला, एका चुकीमुळे थेट जेलवारी घडली..

पुणे : पुण्यातील एका व्यक्तीने एक कांड लपवण्यासाठी दुसरे कांड केले आहे. यामुळे तो चांगलाच अडकला आहे. बायकोला आणि घरच्यांना न सांगता बँकॉकला जाणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने बँकॉकला जाऊन मज्जा मारली. हा कांड बायको आणि कुटुंबापासून लपवण्यासाठी त्याने दुसरा कांड केला.
यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या व्यक्तीला मुंबई विमानतळावर आडवण्यात आलं होतं. बराच वेळ तो आपला कांड पोलिसांपासून देखील लपवत होता. मात्र पोलिसांना जेव्हा त्याचा कांड समजला तेव्हा पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. याची चर्चा सध्या सुरु आहे. मुंबई विमानतळावर पुण्यातील ५१ वर्षीय व्यक्ती इंडोनेशियातून आली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आरोपीची तपासणी केली. यावेळी आरोपीच्या पासपोर्टमधील काही पानं फाडली असल्याचं तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला.
हा व्यक्ती मागील वर्षी बँकॉकला चार वेळा गेला होता. हेच पुरावे कुटुंबापासून लपवण्यासाठी त्याने थेट पासपोर्टमधील पाने फाडल्याचे समोर आले. असे असताना पासपोर्ट कायदा, १९६७ अंतर्गत जाणूनबुजून पासपोर्ट खराब करणे, त्यातील पानं फाडणं हा गुन्हा आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संबंधित व्यक्तीची रेग्युलर तपासणी केली असता, त्याच्या पासपोर्टमधील १७/१८ आणि २१-२६ ही पानं गहाळ आहेत. या पानांवर थायलंडच्या सहलींचे इमिग्रेशन स्टॅम्प होते. त्याने बँकॉक ट्रिपचे पुरावे कुटुंबापासून लपवण्यासाठी पाने फाडल्याचं चौकशीत समोर आल आहे. यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे.