धनंजय मुंडेंचे पाय अजूनच खोलात! परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड, न बोलण्यासाठी १० लाखही पाठवले, भयंकर माहिती आली समोर…


बीड : येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत त्यांनी परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, त्यासाठीच मला बाजूला करण्यात आले आणि नंतर अकाऊंटवर १० लाख रुपये देण्यात आल्याचे सांगितले आहे.

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. त्यांना आज पोलिसांनी अटक केली असून त्यांनी हादरवणारे दावे केले आहेत. रणजीत कासले हे पुणे विमानतळावर आले आणि ते बीड पोलिसांना शरण आले. त्यांनी यावेळी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. त्यांनी धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांवर रणजीत कासले यांनी आरोप केले आहेत.

ते म्हणाले, निवडणुकीच्या दिवशी, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाऊंटवर १० लाख रुपये आले. त्यानंतर परळीमध्ये ईव्हीएम ज्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असे वाल्मिक कराडने आपल्याला सांगितले, असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिले नव्हते. विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती. त्यामुळेच मला बाजूला करण्यात आले. मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

यामुळे सध्या राज्यात प्रकरण तापले आहे. रणजीत कासले यांनी या आधी धनंजय मुंडे यांच्यावर कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याबर याबाबत गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर ३०२ कलम लागले.

दरम्यान, आपणही त्यामध्ये अडकू या भीतीने धनंजय मुंडेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती. असा आरोप रणजीत कासले यांनी केला. याबाबत आता पोलीस येणाऱ्या काळात काय कारवाई करणार आणि ते अजून काही माहिती देणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!