Pune : भाजपला आणखी एक धक्का!! बडा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश? पुण्यात घडतंय काय?

Pune : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. आता पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचा आणखी एक माजी आमदार पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. सोमवारी रात्री उशिरा पुणे विमानतळावर ही भेट झाली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. Pune


दरम्यान बापू पठारे यांनी परवाच गणपती मंडळासमोर बोलताना तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. बापू पठारे सध्या भाजपात असले तरी घरवापसीसाठी इच्छुक आहेत.
त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हे देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे आता बापू पठारे हे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेणार का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.