Pune Heat : पुणेकर ऑक्टोबर हिटने हैराण! शहरातील तापमान ३४ सेल्सिअसवर, उन्हाच्या झळा तीव्र..


Pune Heat पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असून सोमवारी (ता. ९) शहरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सरासरीपेक्षा तापमानात दोन अंशांनी वाढ झाली होती. कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असून दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. Pune Heat

मॉन्सूनने राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली असून कोरड्या हवामानामुळे सध्या उन्हाचा ताप अधिकच जाणवू लागला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा झालेली काहीशी वाढ यामुळे ऑक्टोबर हीटचा प्रभाव होत आहे. Pune Heat

पुणे शहरात उन्हाच्या चटक्यांची अनुभूती होत असून पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. Pune Heat

तसेच पाऊस थांबल्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप नागरिकांना असाच सहन करावा लागणार आहे. तर येत्या रविवारपर्यंत (ता.१५) शहर आणि परिसरात कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंशांपर्यंत पोहचू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यात ही सध्या असेच चित्र पाहायला मिळत असून उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ देखील भाजून निघत आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ३७.१ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पारा ३४ अंशांच्या पुढे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!