Pune Crime : धक्कादायक! केळीच्या दरावरुन झाला वाद, केळी विक्रेत्याने चाकूने वार करुन केले जखमी, धक्कादायक माहिती आली समोर…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. केळी कशी डझन विकत घ्यायची यावरुन वाद घातल्याने रागाच्या भरात केळी विक्रेत्याने ग्राहकावरच चाकूने वार करुन त्याला जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सलमान ताजुद्दीन शेख (वय ३३, रा. धर्मानगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका केळी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुण्याहून नगरकडे जाणार्या रोडवरील आपले घर सोसायटी बसस्टॉपजवळ शनिवारी दुपारी चार वाजता घडली आहे. Pune Crime

सविस्तर माहिती अशी की, आपले घर सोसायटीच्या बसस्टॉपजवळ केळीची हातगाडी उभी होती. फिर्यादी हे केळी घेण्यासाठी हातगाडीवर गेले होते. केळी विक्रेत्यासोबत त्यांचा वाद झाला. वादाच्या रागातून केळी विक्रेत्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

केळी कापण्यासाठी असलेला चाकूने फिर्यादीवर वार केला. तो वार फिर्यादीचे उजव्या डोळयावर लागून फिर्यादी जखमी झाले. केळी विक्रेत्याने मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार जामदार तपास करीत आहेत.