Pune Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना! दारुसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा खून, घटनेने पुणे हादरले..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक घटना समोर येत असतात. सध्या अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
दारुच्या कारणावरुन चक्क मुलानेच आईला ठार मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोराने आणि नातवाने मारहाण केल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामराज नगर परिसरात घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ मे रोजी ही घटना घडली होती.
मंगल मोहन नेटके (वय.६०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके (वय.३०) आणि अल्पवयीन नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या अरुण वाघमारे (वय. ५०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंगल मोहन नेटके या कामराज नगर परिसरात राहत होत्या. 13 मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयूर नेटके याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. मात्र, मंगल नेटके यांनी पैसे देण्यास नकार दिला. Pune Crime
त्यावरून मुलाने आणि नातवाने मंगल नेटके यांना लाकडाने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, उपचार सुरू असतानाच १५ मे रोजी मंगल यांचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी खुन्हाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.