Pune Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर, कर्वेनगर परिसरातील घटनेने उडाली खळबळ…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधमावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहील भरत सावंत (रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहात असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!