Pune Crime : धक्कादायक! शिक्रापूर येथे पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक घटना घडताना दिसत आहे. सध्या असाच एक प्रकार शिक्रापूर येथून समोर आला आहे.

शिक्रापूर येथील पाबळ चौकाजवळ वाहतूक पोलिसाने एकाला दुचाकीला नंबरप्लेट का नाही, वाहन चालवण्याचा परवाना आहे का, असे विचारले. दुचाकीस्वाराकडे परवाना नसल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याचा राग आल्याने दुचाकी चालकाने पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण केली.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा…

याप्रकरणीसोमेश्वर आनंद वाघ (वय.४६ रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानदेव गोरे हे रविवारी (ता.२८) सायंकाळी पाबळ चौक परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी दुचाकीवरुन एक व्यक्ती आला.

गोरेंना दुचाकीचा धक्का लागला. दरम्यान, दुचाकी चालकाला तुझ्या दुचाकीला नंबर का नाही, दुचाकी चालवण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी दुचाकी चालकाने गोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

गोरे यांनी तू माझ्याशी वाद घालू नको, पोलीस ठाण्यात चल असे म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर गोरे पुन्हा वाहतूक नियमनाचे कर्तव्य पार पडण्यासाठी निघाले. Pune Crime

दरम्यान, आरोपी सोमेश्वर वाघ पाठीमागून आला आणि शेजारील हॉटेलमधील खुर्ची घेऊन गोरे यांना मरहाण करत शिवीगळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेल चालक अशोक तकते यांनी दुचाकी चालकाला पकले आणि पुन्हा पोलीस ठाण्यात आणले.

याप्रकणी पोलीस शिपाई ज्ञानदेव दत्तात्रय गोरे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी सोमेश्वर आनंद वाघ याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!