Pune Crime News : गॅस एजन्सी चालकाला धमकावले, खंडणीही घेतली, दोन गुंडांना अटक….

Pune Crime News पुणे : गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयला अडवून गॅस चोरुन नेणारे तसेच एजन्सी मालकाला धमकावून खंडणी उकळणार्या दोघा गुंडांना उत्तमनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Pune Crime News

अमोल परशुराम रायकर (वय. ३०, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) आणि सोमनाथ उद्धव कोमिले (वय. ३२, रा. गोसावी वस्ती, रामनगर, माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी चंदनसिंग भवरसिंग भाटी (वय. २३, रा. डोणजे) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोपरे गावात ३ ते ५ ऑक्टोंबर दरम्यान घडला.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी पृथ्वी एच पी गॅस एजन्सी , अंबिका गॅस एजन्सी, अतिष गॅस सप्लायर्स , गोल्ड मॅन एच पी गॅस एजन्सी व भरेकर गॅस एजन्सी कोथरुड या गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी बॉयच्या सिलेंडर वाहतूकीच्या गाड्या अडविल्या.

त्यानंतर, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन त्यांच्याकडून ३३०० रुपयांचा गॅस चोरुन नेला. त्यांच्या मालकांना दरमहा १५ हजाररुपये हप्ता मागून त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची खंडणी उकळली.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.