Pune Crime News : जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार, हडपसर येथील धक्कादायक घटना, १९ वर्षीय तरुणाला बेड्या..


Pune Crime News  पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गरोदर महिलेला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

याप्रकणी हडपसर येथील २३ वर्षीय महिलेने बुधवारी (ता. २४) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यश संतोष केकान (वय१९, रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. Pune Crime News 

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांचे लग्न झाले असून त्या गरोदर आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी लग्न करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्तीने श्रीगोंदा येथे घेऊन गेला.

दरम्यान, फिर्यादी गरोदर असल्याचे माहीत असतानाही आरोपीने त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!