Pune Crime News : धक्कादायक! निवृत्त पोलीसाच्या मुलाची कोयत्याने सपासप वार करत हत्या, पुण्यातील घटना…

Pune Crime News पुणे : पुण्यात एका निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली आहे. एका निवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२९) सायंकाळच्या सुमारास घडली असुन या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
विजय ढुमे असे हत्या करण्यात आलेल्या निवृत्त पोलिसाच्या मुलाचे नाव आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, विजय ढुमे हे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्यांशी मैत्रीचे संबंध होते तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. (Pune Crime News)
विजय ढुमे लाँजमध्ये गेल्यानंतर आरोपींचे टोळके तिथे दबा धरुन बसला होता. विजय बाहेर येताच दबा धरुन बसलेल्या टोळक्याने हल्ला यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सिंहगड रोड परिसरातील पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.