Pune Crime News : पुण्यात ऑफिसमध्ये महिलेचे काढलेले अश्लील फोटो केले व्हायरल, धक्कादायक माहिती आली समोर, गुन्हा दाखल…


Pune Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकारी महिलेचे अश्लील फोटो काढून ते महिलेच्या मुलीच्या व मुलाच्या व्हॉटसअपवर तसेच इतरांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2२०१९ ते २३ जून २०२४ या कालावधीत विमाननगर भागातील महिलेच्या ऑफिसमधील बेडरुम मध्ये घडला आहे.

याप्रकणी ५३ वर्षीय महिलेने रविवारी (ता.२३) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वेत रंजन पाठक (वय-५४ रा. निको गार्डन, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी विमाननगर भागात एकाच कार्यालयात काम करतात. आरोपीने ऑफिसमधील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या नकळत त्यांचे न्यूड फोटो काढले. Pune Crime News

त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवरुन ते फोटो फिर्यादी महिलेच्या मुलीच्या, मुलाच्या तसेच इतरांच्या व्हॉट्सअॅपवर पाठून महिलेची बदनामी करुन विनयभंग केला.

तसेच न्यूड फोटो २१६ देशात व्हायरल करण्याची धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!