Pune Crime News : डॉक्टराचा तरुणावर कोयत्याने हल्ला, डॉक्टराकडून हल्ल्याचे भयंकर कारण आले समोर…

Pune Crime News : पुण्यात ‘शिकलेल्या’ डॉक्टरनेच कोयता हातात घेत तरुणाच्या घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच रस्त्यात तरुणाची गाडी अडवून त्याला मारहाण केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलीस स्टेशनच्या बाहेर कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.३) सायंकाळी पाच ते सहा दरम्यान वाघोली परिसरात घडला आहे.
याप्रकणी प्रितेश प्रकाश बाफणा (वय.३६ रा. आशिर्वाद बिल्डींग, बजाज शोरुम समोर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉ. विवेक गुप्ता, अजय सावंत, प्रशांत ढमडेरे यांच्याव गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने आरोपी डॉ. गुप्ता व त्याच्या दोन साथीदारांनी तरुणाच्या घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.त्यानंतर डिकॅथलॉन स्पोर्ट्स शोरूम समोर प्रितेश बाफणा याची गाडी अडवून गाडीवर दगड मारुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. Pune Crime News

दरम्यान, याबाबत प्रितेश लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता आरोपींनी पोलीस स्टेशन बाहेर कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.