Pune Crime : नराधम बापाचे नराधम कृत्य! बॅड टचला विरोध केल्याने गरम इस्त्रीचा दिला चटका..

Pune Crime पुणे : शाळेत जाणार्या १५ वर्षाच्या मुलीबरोबर तिचाच बाप अश्लिल चाळे करीत असे. तिच्या अंगाला नको तेथे स्पर्श करीत असे. त्याला तिने विरोध केल्याने बापाने आपल्याच मुलीच्या गालाला गरम इस्त्रीने चटका देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कात्रज येथील एका १५ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४३ वर्षाच्या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी मुलगी ही शाळेत जाते. तिचे वडिल तिला बॅड टच करत असत. त्याला तिने वेळोवेळी विरोध केला होता. शनिवारी सकाळी ती शाळेत जाण्याची तयारी करीत होती. त्यासाठी ती कपड्यांना इस्त्री करत होती. त्यावेळी तिचा बाप मागून येऊन तिला बॅड चट करु लागला.
तिने जाब विचारला असता. त्याने शिवीगाळ करुन तिच्या बॅगेमधील पुस्तके फाडून टाकली. त्यानंतर त्याने तिला पुन्हा बॅड टच केल्यावर तिने बापाला ढकलून दिले.
तेव्हा त्याने गरम इस्त्रीचा चटका तिच्या गालाला देऊन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक थले तपास करीत आहेत.