Pune Crime : दीडशे घरफोड्या करणारा अखेर अटकेत, थेऊर येथील सराईत गुन्हेगाराचा कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश..


Pune Crime  पुणे : पुण्यासह (Pune Crime) इतर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर १५० घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील २२ लाख २० हजार रुपये किमतीचे ३७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

संगतसिंग अजमेर सिंग कल्याणी (वय ४०, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्या थेऊर (Theur) येथील घराला वेढा घालून ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Pune Crime) हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कोंढवा पोलिसांचे पथक काम करत होते. त्यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत असताना आरोपी संगतसिंग याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याने कोंडव्यातील कुबेरा पार्क सोसायटीत घरफोडी केली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक माहिती काढली असता तो थेऊर (Theur) फाटा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे (Kondhwa Police) एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले.

मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने स्वतःला घरात बंद करून घेतले. तब्बल चार ते पाच तास तो घरातच बसून होता. पोलिसांना झुलवत ठेवत मागील दरवाजाने पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी घराला चारही बाजूने घेरल्याने त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला शर्थीने ताब्यात घेत अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मात्र धक्कादायक माहिती समोर आली. त्याने आजवर १५० हून अधिक घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पुणे शहरातील हडपसर, बिबवेवाडी, अलंकार, लोणीकंद, कोथरूड, पर्वती, वानवडी, सिंहगडसह पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अनेक गुन्हे दाखल आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास तो साथीदारांसह जाऊन घरफोडी करायचा. आता मात्र त्यांनी ही पद्धत बदलली असून ओळख पटू नये यासाठी तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यावर टोपी घालून दिवसा घरफोडी करत होता.

दरम्यान, आरोपीकडून कोंढवा पोलीस ठाण्यातील-2. मार्केट यार्ड , बिबवेवाडी आणि वानवडी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील २२ लाख २० हजार रुपये किमतीचे ३७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!