Pune Crime : मुलीच्या नावावर जमीन करा! बापाची मागणी, जावयाचे अपहरण करुन त्याला गोठ्यात बांधले अन्..


Pune Crime पुणे : मुलीच्या नावावर जमीन करुन देण्यासाठी सासरे व त्याच्या नातेवाईकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला बीडला (Beed) नेले. तेथे त्याला चक्क गोठ्यामध्ये हातपाय बांधून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

यापारकणी विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चलुत सासरे रमेश गेमा राठोड व इतर नातवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोम गेता राठोड (सर्व रा. शाहुनगर, पिंपळा गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आडे यांनी त्यांची पत्नीचे नावावर जमीन करावी, अशी त्यांच्या सासर्‍यांची मागणी होती. मात्र, त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता. या कारणावरुन सासर्‍यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने ४ सप्टेबर रोजी फिर्यादी यांचे तोंड दाबून स्कॉपियोमध्ये बसविले. त्यांना बीडमध्ये नेले.

तेथे गेल्यावर गोठ्यामध्ये दोरीने हातपाय बांधून डांबून ठेवले. फिर्यादींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी आर्तिका हिच्या नावावर जमीन कर नाही तर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली.

दरम्यान , ६ सप्टेबर रोजी फिर्यादी यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक होले तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!