भारतीयांसाठी अभिमानाची बातमी! यावर्षी अंतराळात पहिले पाऊल, इस्त्रोची मोठी घोषणा, गगनयानची तारीख ठरली..

नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी महत्वाची असलेल्या गगनयान मोहिमेला डिसेंबर 2018 रोजी मंजूरी मिळाली होती. भारताची ही पहिली मानवी अंतराळ मोहिम असणार आहे. याद्वारे भारतीय अंतराळवीर पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवतील. हे मिशन यशस्वी झाले तर भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरेल.
असे असताना आता भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (ISRO) प्रमुख व्ही. नारायणन यांनी 2025 हे गगनयान वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. हे वर्ष गगनयान मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. गगनयान मिशनासाठी 7200 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर जवळपास 3000 चाचण्या अजून बाकी आहेत. सध्या या मिशनसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, गगनयान ही भारताचा पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. 2027 मधील पहिल्या तिमाहीपर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीरांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोहिम तीन दिवस ते एक आठवडा चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, या मोहिमेचा उद्देश म्हणजे भारतीय अंतराळवीराला स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीन पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे हे आहे. गगनयान मोहिमेसाठी LVM3 या मानवी-योग्य प्रक्षेपण यानाचा वापर केला जाणार आहे. गगनयान अंतर्गत पहिले मानवरहित मिशन याचवर्षी पूर्ण होणार आहे. पहिली मानवरहित मोहिम डिसेंबर 2025 मध्ये व्योममित्र या अर्ध-मानव रोबोटसह प्रक्षेपित केली जाणार आहे.
त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. या चाचण्या मानव सदृश परिस्थितीत यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आहेत. इस्त्रो प्रमुखांनी सांगितले की, या मिशनसाठी केवळ 10 किलो इंधन लागण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती. पण आता अवघ्या 5 किलो इंधनात ते पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. हे मिशन भविष्यातील अंतराळ यानांच्या डॉकिंगसाठी महत्त्वाचे आहे.