आंदोलन पेटलं! शिरपूर अत्याचार प्रकरणी आंदोलनात पोलीस निरीक्षकावर हत्याराने तीक्ष्ण वार…

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असतानाच आता स्वातंत्र्य दिनादिवशी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी काही तरूणांनी रास्तारोके आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यात वाहनांची गर्दी झाली. त्यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आले. त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर मागून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.

सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.याप्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे याला ताब्यात घेतल असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आदिवासी संघटनांनी मूकमोर्चा काढला होता. हा खटला जलदगची न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी माहिती मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांना दिली. त्यानंतर मोर्चा घेण्यात आला होता. पण अर्ध्या तासानंतर काही तरुणांकडून शिरपूर येथील गुजराती काॅम्प्लेक्ससमोर अचानक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांचीं समजूत घालताना पोलीस निरीक्षण जयपाल हिरे तिथे आले आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्यबळाचा वापर करण्यात आला. त्याचेवळी हिरे यांच्यावर मागून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले.
दरम्यान पोलीस निरीक्षकांच्या वरच्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. हल्लेखारांच्या शोधासाठी आता पोलिसांचे पथक रवाना झालेले आहे.
