मांसविक्री बंदीचा निषेध अन् घरीच ठेवली बिर्याणी पार्टी!! जलील यांनी थेट किचनमध्ये बनवला चिकन खुर्मा..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मांसविक्री बंदीच्या निर्णयामुळे राज्यात वाद सुरू आहेत. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून आज त्यांच्या घरीच नॉन व्हेज मटण, चिकन बिर्याणी पार्टीचं आयोजन करण्यात आले.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण दिले होते. छत्रपती संभाजीनगर मधील इम्तियाज  जलील यांच्या निवासस्थानातील स्वयंपाकघरात थेट जलील यांनी हा बेत केला आहे.

त्यांनी स्वतःच्या हाताने नॉनव्हेज बिर्याणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. इम्तियाज जलील यांनी महापालिकेच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाचा तीव्र आक्षेप नोंदवत हा निर्णय व्यक्तीच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता जलील यांनी आपल्या कृतीतून त्यांनी प्रशासनाच्या या आदेशाला प्रत्यक्ष आव्हान दिले आहे. दरम्यान, विरोधकांनी या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत, यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!