पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; प्रशासनाकडून होणार जंगी स्वागत..
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
यावेळी ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा देखील करणार आहेत. मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोलिसांकडून मंदिराची पाहणी करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारकचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकापर्ण सुद्धा होणार आहेत.
लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान नरेद्र मोदी हे हेलिकॉप्टरने सिंचन भवन येथे येणार आहेत. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची बैठक झाली. तसेच त्यांनी मोदी यांच्या लोहगाव ते कार्यक्रम स्थळ या मार्गाची पाहणी केली.