खाद्यतेलाच्या भावाने केला उच्चांक किलोमागे 25 रुपयांची वाढ, सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडले…

मुंबई : सध्या महागाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना बसत आहेत. असे असताना आता खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्यांनी सांगितले आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. यामुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. यामुळे आता राज्यातही हे दर वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्यांनी सांगितले आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसणार आहे.
दोन वर्षांपूर्वी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशातंर्गत खाद्यतेलाच्या किंमती जमिनीवर आल्या. सूर्यफूल तेलाचा भाव पूर्वी 120 रुपये प्रति किलो होता. आता त्यात किलोमागे 20 रुपयाची भाव वाढ झाली. सूर्यफूल तेल प्रति किलो 140 रुपयांवर पोहचले.
दरम्यान, मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे. तेलाचे 30 टक्के दर वधारले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात हे दर अजून वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.