पुण्यात झळकले ‘आम्ही सारे सावरकर’चे पोस्टर्स; भाजपकडून लावण्यात आले फलक…!


पुणे: संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर या विषयावर चर्चा व वादळ उठले आहे. असे असतानाच पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा ‘मी सावरकर’ या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्याची चर्चा शहरात चालू आहे. भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी हे फलक शहरात लावले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात आहे. याच्या निषेधार्थ आणि सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही‌ मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा ‘मी सावरकर’ या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी लावले आहेत. शहरात झळकणाऱ्या या फलकांची चर्चा होत आहे.

याविषयी बोलताना अमित गोरखे म्हणाले की, ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत. तसे करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे ‌’आम्ही सारे सावरकर’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही’, असेही त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!