Pooja Khedkar : यूपीएससीवर कारवाई करा, पूजा खेडकरला जन्मठेपेची शिक्षा द्या, राज्यातील आमदार भडकला…

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलं आहे. दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.
पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. बच्चू कडू यांच्या या मागणीनंतर आता सरकार काय भूमिका घेतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Pooja Khedkar
पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचा दावा करत त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बच्चू कडू हे राज्यातील दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आहेत. बच्चू कडू यांच्याकडून दिव्यांगांसाठी काम केलं जातं. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे दिव्यांग असल्याची खोटी बतावणी केल्याची चर्चा आहे. यावरुनच बच्चू कडू यांनी पूजा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.