Politics News : हवेलीत अशोक पवार यांना अनेक कार्यकर्त्यांची सोडचिठ्ठी! कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश…

Politics News उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशोक पवार यांच्याशी गेल्या तीन विधानसभा निवडणूकीत एकनिष्ठ असलेल्या पूर्व हवेलीतील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांनी रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशकरीत आहे.
पूर्व हवेलीत अनेक कार्यकर्त्यांनी प्राथमिकरीत्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षात तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (ता.६) रोजी पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर ,उरुळी कांचन व पेठ -नायगाव येथील कार्यकर्त्यांचा हा प्रवेश झाला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी फुटीनंतर मोठ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांत भर पडली आहे. त्यामुळे या संघटनात्मक ताकदीचा येत्या विधानसभेत परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रवेश कार्यक्रमास शांताराम कटके, सोमनाथ आव्हाळे, युवराज काळभोर, किरण वाळके, रमेश काळभोर, नवनाथ गायकवाड, सुनील कांचन, सतीश काळभोर, सचिन वाघुले, स्वप्नील काळभोर, संदीप कुंजीर उपस्थित होते. Politics News
यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले की, अजित पवार यांचा विकासाचा अजेंडा घेऊन राज्याचे नेतृत्व करीत आहे. पुणे जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांचे नेतृत्व जनतेची अपेक्षा पूर्ण करणार आहे. पूर्व हवेलीतील अनेक जटील प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य फक्त अजित पवार यांच्याकडे आहे.