Breaking ! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विष प्रयोग ! कराची रुग्णालयात दाखल केल्याची सोशल मिडीयात खबर व्हायरल ..!!

नवी दिल्ली : मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात (Mumbai Bomb Blast 1993) तब्बल 250 जणांचा मृत्यू तर हजारो जण जखमी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे दाऊद इब्राहीमच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. परंतु पाकिस्तान (Pakistan) दाऊदचा ताबा भारताकडे देण्यास तयार नव्हता.

आता त्याच्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केले असून एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर विषप्रयोग केल्यानंतर त्याची तब्येत चिंताजनक झाल्याची माहिती आहे. परंतु, याबाबत भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कोणत्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही.


दरम्यान, दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. दाऊदला गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल असून त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवलं आहे. जेथे दाऊदवर उपचार सुरु आहेत तिथे कोणालाही जाण्याची परवानगी दिली नाही. फक्त उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळच्या लोकांना तिथे जाता येईल, असे त्याने सांगितलं आहे.