PM Swearing Ceremony : ठरलं! देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, नेतेपदी मोदींची निवड, शपथविधीची तारीख आणि वेळही ठरली…

PM Swearing Ceremony : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान असून रविवार, ९ जून २०२४ रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तारीखही ठरली आहे.
९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

एनडीएच्या खासदारांव्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते, जिथे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे. PM Swearing Ceremony


दरम्यान, ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.