महाकुंभला जाण्यासाठी विमानाचं तिकीट किती? वाढलेल्या दराने सगळेच हैराण, त्यापेक्षा लंडनला जाणं स्वस्त, जाणून घ्या…


पुणे : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. लोक बस, ट्रेन्स आणि फ्लाइटने महाकुंभसाठी येत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आज प्रयागराजला येणाऱ्या विमान तिकीटांचे दर 10 पटीने वाढले आहेत. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरवेळी प्रयागराजच्या विमान तिकीटाचा दर 5 हजार रुपये आहे. पण आता महाकुंभसाठी इथे जाणाऱ्या विमान तिकीटाचा दर 30 ते 50 हजार रुपये आहे. यामुळे या काळात जाण्यासाठी मोठा खर्च होत आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

सध्या दिल्ली ते लंडन तिकीटाचे दर 30 ते 37 हजार रुपये आहे. इंडोनेशियाच्या तिकीटाचा दर 27 हजार रुपये आहे. मलेशियाचा विमान तिकीटाचा दर 10 ते 15 हजार रुपये आहे. यामुळे या तिकीट दरात तुम्ही परदेशात जाऊन येचाल. म्हणजे प्रयागराजला जाण्यापेक्षा परदेश प्रवास जास्त स्वस्त आहे.

दरम्यान, प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येचा दिवस आहे. याठिकाणी रात्री 1 वाजता इथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत जवळपास 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बचावकार्य सुरू आहे.

या महापर्वात आज शाही स्नानासाठी जवळपास 10 कोटी लोक पोहोचण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. भाविकांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि एअर लाइन्स मिळून काम करत आहेत. जेणेकरुन प्रवास थोडा सोप्पा होईल.

सध्या दिल्ली-प्रयागराज विमान तिकीट 50 हजार रुपये. मुंबई-प्रयागराज तिकीट 60 हजार रुपये, जयपूर-प्रयागराज तिकीट दर 26 हजार रुपये, हैदराबाद-प्रयागराज 54 हजार रुपये, बंगळुरु-प्रयागराज 70 हजार रुपये, कोलकाता-प्रयागराज 27 हजार रुपये, अहमदाबाद-प्रयागराज 54 हजार रुपये, असे दर आहेत. यामुळे हे दर 10 पटीने वाढले आहेत.

दरम्यान, लंडन, बाली, मलेशिया, दुबई, मालदीव आणि थायलंडला जायच असेल, तर महाकुंभपेक्षा स्वस्त विमान तिकीट पडेल. यामुळे येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!