बँकांमधील कामाचं करा नियोजन! फेब्रुवारीत बँका तब्बल १४ दिवस बंद, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वर्षाचा दुसरा महिना, फेब्रुवारी, सुरू होणार आहे आणि यावेळी या महिन्यात 28 दिवस आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, या २८ दिवसांतही तुम्हाला बँकिंगचे काम करण्यासाठी पूर्ण कामकाजाचे दिवस मिळणार नाहीत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी जारी केली आहे. तुम्ही देखील तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार अन् कोणत्या दिवशी सुरु राहणार हे आपण जाणून घेऊयात..
फेब्रुवारीमध्ये बँक सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे…
३ फेब्रुवारी (सोमवार) – सरस्वती पूजनाच्या निमित्तानं अगरताळामध्ये बँक बंद राहील.

११ फेब्रुवारी (मंगळवार) – थाई पूसामच्या निमित्तानं चेन्नईत बँका बंद असतील.

१२ फेब्रुवारी(बुधवार) – श्री रविदास जयंती निमित्तानं शिमला येथे बँका बंद असतील.
१५ फेब्रुवारी (शनिवार) – लुई-नगाई-नी निमित्तानं इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१९ फेब्रुवारी (बुधवार) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर, मुंबई, नागपूरमध्ये बँकांना सुट्टी राहील.
२० फेब्रुवारी (गुरुवार) – अरुणाचल प्रदेश, मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त ऐझवाल, इटानगरमध्ये बँका बंद असतील.
२६ फेब्रुवारी (बुधवार ) – महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, ऐझवाल, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद असतील.
२८ फेब्रुवारी (शुक्रवार) – लोसार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील.
शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांबद्दल देखील जाणून घ्या..
२ फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
८ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला दुसरा शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
१६ फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
२२ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारीला चौथ्या शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.