मिस्टेक झाली!! वीजबिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो, महावितरणचा कारभार…

जळगाव : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तरीही अजून, वीजबिलांवर मुख्यमंत्री म्हणून मान मात्र उद्धव ठाकरे यांना देण्यात असल्याचे चित्र समोर आले आहे.
महावितरणनं जानेवारीत वितरित केलेल्या वीजबिलांवर, अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. विधानसभेत महायुती सरकारनं बाजी मारली. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.
पण वीजबिलावर मात्र मुख्यमंत्री म्हणून मान मात्र उद्धव ठाकरे यांना आल्याचे चित्र आहे. दरम्यान, महावितरणकडून दर महिन्याला वीजबिलाच्या प्रिंटची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवण्यात येते.
तसेच नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणेने छापली असली तरी, मक्तेदाराने मात्र शहरात तब्बल चार हजार वीजबिले ही जुन्या कागदांवर छापली होती. याबाबत आता चौकशी सुरू झाली असून, मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, महावितरणनं नव्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसहीत, नव्या वीज बिलाचा फॉरमॅट तयार केला होता. दरमहिन्याला हा फॉरमॅट मक्तेदाराला पाठवण्यात येतो. मक्तेदाराने मात्र तब्बल चार हजार वीजबिले ही जुन्या कागदांवर छापली आहेत. त्यामुले वीजबिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचंच चित्र आहे.