अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं अन्….,कुरिअरवाला नव्हे तर बॉयफ्रेंडच, कोंढवा प्रकरणात धक्कादाक खुलासा

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, एका २८ ते ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारिरीक संबंधात होते. मात्र, त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने सगळं गणित बिघडलं. त्यामुळे, लव्ह, सेक्स अन् धोका असा हा प्रकार असल्याचे समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला असून दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता, बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यामुळे, तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली अन् आपण कुरिअर बॉय असल्याचं परिसरात भासवलं. ‘
कुरिअर बॉयने अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बळजबरी करणारा युवक हा डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. त्यावेळी, शारिरीक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
मुलाने शारिरीक संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला. मात्र, तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातून, दोघांमध्ये वाद झाला अन् तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली. मात्र, पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर लव्ह, सेक्स अन् धोका.. असा धक्कादायक ट्रायअँगल समोर आला.