शिक्षण क्षेत्रात खळबळ! आई-बाबा मला माफ करा, भावस्पर्शी चिठ्ठी लिहून १६ वर्षीय मुलाने संपवलं जीवन, घटनेने सगळेच हादरले…


नागपूर : एका १६ वर्षीय शैक्षणिक दबावातून विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नागपूरमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ख्वाहिश देवराम नागरे असे आत्महत्या विकेलेल्या द्यार्थ्याचे नाव आहे. त्याने तत्पूर्वी आपल्या पालकांसाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी सुसाईड नोट लिहिली आहे.

ख्वाहिशने लिहिलेली चिठ्ठी प्रत्येक पालकांसाठी एकप्रकारे इशारा आणि डोळ्यातून पाणी आणणारी आहे. ज्या पालकांना वाटते की, त्यांची मुले सर्व प्रकारच्या दबावांना तोंड देऊ शकतात.

ख्वाहिशने चिठ्ठीत लिहिले की, “सॉरी आई-बाबा, मी हे करू शकणार नाही.. मी दीड आठवड्यापासून विचार करत होतो की मी हे करू शकणार नाही… माफ करा… आणि मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद… मी तुला खूप प्रेम करतो आई-बाबा… पण तेवढे पुरे झाले… मी आता ते करू शकत नाही… तुमची शेवटची भेट घ्यायची इच्छा होती. मात्र, मला भेटता येणार नाही, दीदीची काळजी घ्या. बाय…” असा मजकूर १६ वर्षीय ख्वाहिशने लिहिलेल्या चिठ्ठीत आढळलाल, हा मेसेज वाचल्यानंतर अनेकांचे डोळे पाणवले.

दरम्यान, ख्वाहिशला नुकतेच त्याच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशसाठी असलेल्या ‘नीट’च्या तयारीसाठी बालाघाटवरून नागपूरला पाठवले होते. तो हिलटॉप भागातील हॉस्टेलवाला या वसतिगृहत राहायला होता. मात्र, या घटनेनं शिक्षण क्षेत्रालाचा विचार करायला भाग पाडलं आहे, तर पोलिसांनी देखील पालकांना आपल्या पाल्ल्यांवर जबाबदारीचे ओझे न टाकण्याचे अवाहन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!