रामटेक बंगला अडचणी सतरा!! अडचणींचा बंगला असा इतिहास असलेला पंकजा मुंडे यांनी मागून घेतला, कारण काय?


मुंबई : राज्यात नुकतेच मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर काल मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झालं. यावेळी रामटेक बंगला कोणाच्या वाट्याला जाणार याची जोरदार चर्चा रंगली होती. याचे कारण म्हणजे या बंगल्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. या बंगल्यात वास्तव्यात राहिलेले अनेक मंत्री वादात सापडले आहेत.

यातील काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. नेमका हाच बंगला बावनकुळेंना मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते घाबरले होते. पण आता हा बंगला पंकजा यांनी मागून घेतल्यानं बावनकुळेंच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

सुरुवातीला बावनकुळेंना रामटेक बंगला मिळाल्यानं कार्यकर्ते, निकटवर्तीय चिंतेत पडले. पण पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला मागितल्यानं बावनकुळेंच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. महसूल मंत्री झालेल्या बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आला होता. असे असताना पंकजा मुंडेंनी त्यांना मिळालेला पर्णकुटी बंगला सोडून रामटेकची मागणी केली.

रामटेक बंगला प्रशस्त आहे. मलबार हिल परिसरात असलेल्या बंगल्यातून समुद्र दिसतो. पंकजा मुंडेंना फडणवीस सरकारमध्ये पर्यावरण खातं मिळालं आहे. आणि त्यांनी हा बंगला मागून घेतला. आता याचे कारण समोर आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे गृहखातं होतं. त्यावेळी त्यांना रामटेक हाच बंगला मिळाला होता. त्यामुळेच आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला मागून घेतल्याची चर्चा आहे. इतिहास चांगला नसला तरी त्यांनी हा बंगला घेतला.

याआधी छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांनी हा बंगला मिळाला होता. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे हा अडचणींचा बंगला म्हणून सगळीकडे चर्चेत आला होता. आता पंकजा मुंडे यांना हा बंगला मिळाला असल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!