पाकिस्तानचा फुसका बार, मिलाईल टाकलं पण ते फुटलंच नाही, सगळ्या देशात झालं हसू, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : सध्या भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ले सुरु आहेत. पाकिस्तान सातत्याने भारतावर कुरघोड्या करताना दिसतोय. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्याची खुमखुमी असल्याचे दिसतेय. मात्र पाकिस्तानचा कोणताच डाव भारतीय लष्कर यशस्वी होत देत नाही. याची प्रचिती अनेकदा येत आहे.
असे असताना काल देखील पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हा डाव चांगलाच उधळून लावल्याची माहिती आहे. अशातच पुन्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. भारतीय जवान पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत आहेत.
आता पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं मिसाईल फुसका बार निघाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडून भारतावर डागण्यात आलेलं मिसाईल फुटलंच नाही. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे पाकिस्तानचे सगळीकडे हसू झाले आहे.
पाकिस्तानचा जैसरमेल येथे हल्ला करण्याचा डाव होता. यासाठी पाकिस्तानकडून जैसरमेल येथे मिसाईल हल्ला करण्यात आला मात्र पाकचा डाव उधळला असून हे मिसाईल न फुटता असंच एका मोकळ्या जागेत पडल्याचे पाहायला मिळतंय. यानंतर जैसरमेल येथील नागरिकांनी हे फुसकं आणि बोगस मिसाईल बघण्यासाठी गर्दी केली. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
काल देखील पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारतीय जवानांनी सगळे डाव उधळून लावले आहेत. यामुळे पाकिस्तान रोजच तोंडावर पडत आहे. जवान सध्या मोठ्या हिमतीने पाकला उत्तर देत आहेत.